डोंबिवली- आगरी-कोळी वारकरी भवनचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ७ जून रोजी होणार आहे. बेतवडे – उसरघर सीमा प्रांत, दिवा (पूर्व) येथे जा कार्यक्रम पार पडणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याच्या नियोजनाबाबत विचारविनिमय करण्यासाठी २ जून रोजी मानपाड्यातील मानपाडेश्वर मंदिर येथे सभा घेण्यात आली होती.
या सभेत संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे, दत्ता वझे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, अभिजित दरेकर, जतिन पाटील, सागर जेधे, माजी नगरसेवक नितीन पाटील, जालिंदर पाटील, अर्जुन पाटील, शरद पाटील, बाळकृष्ण महाराज, जयेश महाराज, गणेश महाराज, प्रकाश महाराज, पाच गावातील महिला वारकरी व वारकरी संप्रदायाची मंडळी उपस्थित होते.
आगरी-कोळी वारकरी भवनाचे भूमिपूजन
