आंबोली मॅरेथॉनमध्ये पाचशेहून अधिक स्पर्धक सहभागी

सावंतवाडी- आंबोली सरपंच आणि सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमतर्फे काल पहाटे ६ वाजता आंबोली मान्सून मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या मॅरेथॉनमध्ये पाचशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनातून आंबोली मान्सून मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्ध्रा दोन टप्प्यांत घेण्यात आली. यातील पहिला टप्पा २१ किलोमीटरचा तर दुसरा ६ किलोमीटरचा होता. या दोन्ही गटांत मिळून पाचशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. २१ किलोमीटर टप्प्याच्या स्पर्धेत पुरुष गटात सिद्धेश बारजे, तर महिला गटात दीपिका चौगुले विजेती ठरली तर ६ किलोमीटर टप्प्याच्या स्पर्धेत १८ वर्षाखालील मुलांच्या गटात ऋतिक वर्मा, तर मुलींच्या गटात आयुष्या राऊळ हे विजेते ठरले. १८ वर्षावरील पुरुष गटात ओंकार बायकरस, तर महिला गटात वैष्णवी चौधरी विजेते ठरले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top