सिंधुदुर्ग – आंबोली घाटातील रस्त्यावर भलामोठा दगड कोसळला. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. आज सकाळी आठच्या सुमारास आंबोलीतील मुख्य धबधब्याच्या काही अंतरावर हा दगड पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. नंतर घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली, परंतु मोठ्या वाहनांना जाण्यास मनाई केली होती. अखेर अडीच तासांनी जेसीबीच्या साहाय्याने हा भला मोठा दगड बाजूला केल्यानंतर घाटातील वाहतूक पूर्ववत झाली.
मुसळधार पावसामुळे घाटात दरड कोसळत आहे. घाट रस्ता धोकादायक बनला आहे. त्यामुळे प्रवासी आणि पर्यटकात भीतीचे वातावरण आहे. आंबोली घाटात २ आठवड्यापूर्वी असाच भला मोठा दगड खाली आला होता. त्यामुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला होता. मात्र नंतर तो दगड जेसीबीच्या साह्याने बाजूला करण्यात आला होता.