लॉस एंजलिस –
अमेरिकेतील मोंटाना राज्यातील यलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये अस्वलाने महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात या महिलेचा मृत्यू झाला आहे. ज्या भागात महिला सापडली, तो भाग तातडीने बंद करण्यात आला होता. यलोस्टोन नॅशनल पार्कच्या पायवाटेवर या महिला मृतदेह सापडला. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत. यलोस्टोन नॅशनल पार्क हे अमेरिकेतील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध पार्क आहे.