अवघ्या २५ दिवसांत बनविला दुर्गाडी गणेश घाटावर नवा रस्ता

कल्याण – कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील दुर्गाडी येथील गणेश घाटावर दिवसरात्र काम करून नवीन रस्ता २५ दिवसांच्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात आला आहे.या सर्व कामांसाठी महापालिकेने २ कोटी रुपयांच्या खर्चाची मान्यता दिली आहे.

या गणेश घाटावर घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मूर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन होते. यासाठी दुर्गामाता चौकातून गणेश घाटाकडे जाणारे दोन रस्ते होते. एक मार्ग प्रवेशासाठी आणि दुसरा मार्ग बाहेर येण्यासाठी वापरला जात होता.मात्र चालू वर्षी नेव्हल म्युझियमच्या बांधकामामुळे या मार्गांपैकी एक मार्ग कायमस्वरूपी बंद करण्यात आला होता.यामुळे विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाची गरज निर्माण झाली होती. त्यामुळे महापालिकेने पर्यायी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आणि रिंग रोडवरील सीएनजी पेट्रोल पंपापासून दुर्गाडी गणेश घाटाकडे नवीन रस्ता तयार केला आहे. हा रस्ता ११५ मीटर लांबीचा आणि १५ मीटर रुंद आहे.२.७० मीटर उताराच्या भागात रिटेनींग वॉल बनवून माती भराव करण्यात आली आहे. पावसाळ्यात नाल्याच्या पूलाचे काम चालू ठेवण्यात आले.नाल्यावर सहा फुट व्यासाचे चार पाईप टाकून पूल बांधला आहे. रस्त्याचे काम पेव्हर ब्लॉक वापरून पूर्ण करण्यात आले आहे. सर्व कामांसाठी पालिकेने दोन कोटी रुपयांच्या खर्चाची मान्यता दिली आहे.
पालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांनी या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली असून श्री गणेशोत्सवाच्या आधी हे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top