वॉशिंग्टन – वैज्ञानिक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे कार्य पृथ्वीवरून सोडलेली अवकाशयाने करीत असतात,पण सध्या अवकाशात निकामी याने, उपग्रह यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. अवकाशात वेगाने फिरणाऱ्या या उपग्रहांच्या कचऱ्यामुळे आपल्या भविष्यातील अवकाश मोहिमांना धोका निर्माण झाला आहे.
युरोपियन अवकाश संस्थेने (इएसए-इसा) नुकत्यात प्रसिद्ध केलेल्या ‘अवकाश पर्यावरण अहवाल-२०२४’ मध्ये ही बाब नमूद केली आहे.या अहवालात म्हटले आहे की,पृथ्वीच्या चारही बाजूंना अवकाश कचरा जमा झाला आहे. अवकाशात इतस्ततः फिरणारे बहुतेक उपग्रह हे २०२३ मध्ये सोडलेले आहेत.निगराणी यंत्रणेद्वारे सध्या अशा ३५ हजारपेक्षा जास्त उपकरणांवर लक्ष ठेवले जात आहे.त्यामध्ये अवकाशात चार इंचाच्या आकारापेक्षा मोठे असलेले सुमारे २६ हजार तुकडे फिरत आहेत.त्यामुळे अवकाश असुरक्षित बनत आहे.
पृथ्वीच्या कक्षेत फिरणारे उपग्रह आणि ते निकामी झाल्यानंतर होणाऱ्या कचऱ्याचा आढावा या अहवालात घेतला आहे. हा अहवाल २०१७ पासून दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. अवकाशीय घडामोडींची नोंद यात घेतली जाते.अवकाशीय कचऱ्याचा प्रश्नाचे गांभीर्य यातून दाखवले आहे.