मुंबई- मागील चार दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.पण सध्या अवकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे.त्यामुळे राज्यातील किमान तापमानात पुन्हा घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आजपासून ढगाळ वातावरण लक्षणीय प्रमाणात कमी होईल. रात्रीच्या तापमानात तसेच पहाटेच्या सुमारास नोंदवले जाणाऱ्या किमान तापमानात टप्प्याटप्प्याने घट होईल. कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.