हैदराबाद-हैदराबादच्या संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी सुपरस्टार अल्लू अर्जुनला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात नामपल्ली कोर्टाने अल्लू अर्जुनला नियमित जामीन मंजूर केला आहे.
4 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुन प्रीमियर शो साठी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये दाखल झाला होता. त्यावेळी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी चेंगराचेंगरीत एका महिलेचा चेंगरून मृत्यू झाला होता. तर त्या महिलेचा मुलगा यामध्ये जखमी झाला होता. या प्रकरणी अल्लु अर्जुनवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याला उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता.