हैद्राबाद- अभिनेता अल्लू अर्जुन याच्या नियमित जामीन अर्जावरील सुनावणी ३ जानेवारीला होणार आहे. हैद्राबादच्या नामपल्ली न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत अल्लू अर्जुनच्या वकिलांनी नियमित जामिनाची मागणी केली. यावेळी त्यांनी केलेल्या युक्तिवादाला आव्हान देणारे प्रतिज्ञापत्र चिकलपट्टी पोलिसांनी न्यायालयात सादर केले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने ही सुनावणी ३ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली.हैद्राबादमधील एका सिनेमागृहात ४ डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनच्या उपस्थिती दरम्यान त्याच्या चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अल्लू अर्जुन याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन दिल्यानंतर तो तुरुंगातून बाहेर आला होता. त्याच्या नियमित जामिनासाठीच्या अर्जाची सुनावणी सध्या नामपल्ली न्यायालयात सुरु आहे. चिकलपट्टी पोलिसांनी अल्लू अर्जुनच्या नियमित जामिनाला विरोध करणारे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. तर अल्लू अर्जुनच्या वकिलांनी त्याला नियमित जामीन देण्याची मागणी केली.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |