अर्थसंकल्पावर टीका केली! तामिळनाडूत तरुणाला अटक

चेन्नई – तामिळनाडू राज्याच्या अर्थसंकल्पावर सोशल मिडीयातून टीका करणाऱ्या एका तरुणाला चेन्नई पोलिसांनी अटक केली. \’व्हॉइस ऑफ सावुक्कू\’ चा अॅडमिनिस्ट्रेटर असणाऱ्या २३ वर्षीय तरुणाविरोधात चेन्नई पोलिसांच्या सायबर शाखेने ही कारवाई केली.

या ट्विटर पेजवरून राज्याच्या अर्थसंकल्पाविरोधात व्हिडिओ मीम्स आणि आक्षेपार्ह ट्विट करण्यात आल्याचा आरोप या युवकावर ठेवण्यात आला आहे. त्याचे नाव प्रदीप असल्याचे सांगण्यात येत असून गुमिडिप्पोंडी येथून मंगळवारी रात्री त्याला अटक केली. महिला आयोगाच्या एका सदस्याच्या तक्रारीवरून या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती चेन्नई सायबर पोलिसांनी दिली.

राज्याचे अर्थमंत्री पी.टी.आर. त्यागराजन यांनी कुटुंबप्रमुख महिलांसाठी एक हजार रुपये देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली. यासंबंधी महिलांविषयी आक्षेपार्ह ट्विट केल्याचा या तरुणावर आरोप आहे.

Scroll to Top