सेऊल – भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज मंगळवारपासून दक्षिण कोरियाच्या चार दिवसीय दौर्यावर असणार आहेत. त्या आज पहाटे दक्षिण कोरिया देशात दाखल झाल्या असून त्या ५ मे पर्यंत चालणार्या आशियाई विकास बँकेच्या ‘एडीबी’च्या५६ व्या वार्षिक बैठकीत सहभागी होणार आहेत.
यासंदर्भात भारताच्या अर्थ मंत्रालयाने ट्विट करून म्हटले आहे की, केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती सीतारामन या त्यांच्या चार दिवसांच्या अधिकृत दौर्यासाठी दक्षिण कोरियात पोहोचल्या. आज पहाटे इंचॉन विमानतळावर आगमन झाले. यावेळी कोरियातील भारताचे राजदूत अमित कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. सीतारमण या एडीबीच्या गव्हर्नर मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याव्यतिरिक्त, गुंतवणूकदारांना संबोधित करतील आणि द्विपक्षीय बैठका घेतील. तसेच जागतिक व्यावसायिक नेत्यांशी आणि गुंतवणूकदारांशी गोलमेजांमध्ये संवाद साधतील. तसेच डायस्पोरा समुदायाशीही संवाद साधतील.-त्याचप्रमाणे त्या गव्हर्नर्स बिझनेस सारख्या वार्षिक मीटिंग फोकल इव्हेंटमध्ये सहभागी होतील. एडीबी गव्हर्नर्सच्या ‘पॉलिसीज टू सपोर्ट टू सपोर्ट आशियाज रिबाउंड’ या विषयावरील चर्चासत्रातही त्या पॅनेलवर असतील.