मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार उद्या राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करणार आहेत. ते ११ व्या वेळा अर्थसंकल्प मांडणार असून राज्याच्या इतिहासात इतक्या वेळा अर्थसंकल्प सादर करणारे ते एकमेव अथमंत्री आहेत. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी महायुतीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत १,५०० रुपयांएेवजी २,१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प मांडणार
