मुंबई – विनोदी अभिनेत्री अर्चना पुरण सिंह चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना अचानक खाली कोसळल्या आणि त्यांच्या हाताला फॅक्चर झाले. त्यांनी दुखापतीबद्दल सर्व माहिती यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करुन दिली. आपल्या आईची अवस्था पाहून त्यांचा मुलगा भावूक झाला.या व्हिडिओतून अर्चना यांनी सांगितले की, “जे होते ते चांगल्यासाठी होते. यावर मी विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मी ठीक आहे. नेहमीप्रमाणेच सकारात्मक आहे. फक्त एका हाताने काम करताना किती त्रास होतो आणि अडचणी येतात हे आता मला समजत आहे.” दुखापतीनंतर अर्चना यांनी राजकुमार रावला फोन करुन प्रोडक्शनमध्ये उशीर होत असल्यामुळे त्याची माफी मागितली.
अर्चना पुरण सिंगला शुटिंगदरम्यान दुखापत
