नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आज मुख्यमंत्री निवासस्थान सोडले. केजरीवाल कुटुंबासह नवी दिल्लीच्या मंडी हाऊस परिसरातील फिरोजशाह रस्ता बंगला क्रमांक ५ येथे राहण्यासाठी गेले आहेत. हे निवासस्थान आपचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांना केंद्र सरकारने दिला आहे.- केजरीवालांसह त्यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री निवानस्थानी असलेल्या कर्मचाऱ्यांनी भावनिक निरोप दिला. त्यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना मिठी मारली. त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी निवासस्थानाच्या चाव्या एका अधिकाऱ्याला दिल्या. यानंतर आपने एक्स पोस्ट करत म्हटले आहे की, “त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवत नाही, तोपर्यंत ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहणार नाहीत”.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |