नवी दिल्ली – अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या परवेश वर्मा यांच्या गुंडांनी प्रचारा दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्यावर वीटा व दगडांनी हल्ला केल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ प्रसारित करुन परवेश वर्मा केजरीवालांना प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपने म्हटले आहे.
आपने ट्विटरवर हा व्हिडीओ जारी करत पराभवाच्या भितीने भाजपा अस्वस्थ असल्याचे म्हटले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत या आधीही परवेश वर्मा यांनी महिलांना पैसे वाटल्याची बातमी प्रसारित करण्यात आली होती. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ दिल्लीतील संघर्षाचे प्रमुख केंद्र झाले असून आप, भाजपा व काँग्रेसनेही आपले मोठे उमेदवार या मतदारसंघात ऊभे केले आहेत.
अरविंद केजरीवालांवर हल्ला! आपचा भाजपावर आरोप
