नवी दिल्ली
दिल्ली मद्य धोरण प्रकरणी सीबीआयमार्फत दाखल केलेल्या गुन्ह्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याबाबत पुढील सुनावणी २३ ऑगस्ट रोजी आहे.
आजच्या सुनावणीदरम्यान अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद करताना म्हटले की केजरीवाल यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अंतरिम जामीन मिळाला आहे . तसेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ट्रायल कोर्टाने जामीन दिला आहे . मात्र न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी जामीन अर्ज फेटाळला . केजरीवालांना भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्या पाहता या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ ऑगस्ट होईल असे त्यांनी पुढे म्हटले.