Home / News / अयोध्येहून परतणाऱ्या कारचा अपघात! ४ जणांचा मृत्यू

अयोध्येहून परतणाऱ्या कारचा अपघात! ४ जणांचा मृत्यू

भोपाळ मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील पाचोर येथे भरधाव कार कंटेनरला धडकली. ही कार अयोध्येहून कोल्हापूरला जात होती. या अपघातात एका...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

भोपाळ

मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील पाचोर येथे भरधाव कार कंटेनरला धडकली. ही कार अयोध्येहून कोल्हापूरला जात होती. या अपघातात एका महिलेसह ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १ जण गंभीर जखमी झाला. हे सर्वजण कोल्हापूरमधील आहेत. रमिला अत्तार, अमीन अत्तार, भगवान दगडू पवार आणि दिलदार तांबोळी अशी मृतांची नावे आहेत. तर अनिल पाटील असे जखमी व्यक्तीचे नाव असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत पाचोर पोलीस स्थानकाच्या प्रभारी आकांक्षा शर्मा यांनी सांगितले की, काल सकाळी ९.३० च्या सुमारास राजगड जिल्ह्यातील पाचोर जवळील सारेडी गावाजवळ हा अपघात झाला. भरधाव कार थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून धडकली. यात रमिला, अमीन आणि भगवान यांचा जागीच मृत्यू झाला. तर दिलदार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अनिल गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कारमधील सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते कारने उत्तर प्रदेशातील अयोध्येहून महाराष्ट्रात परतत होते. या अपघातात कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

Web Title:
संबंधित बातम्या