अयोध्या – अयोध्येत एका मंदिरात पुजार्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना अयोध्येतील कोतवाली परिसरात असलेल्या रायगंजमध्ये नरसिंह मंदिरात घडली. राम शंकर दास असे या पुजाऱ्याचे नाव होते. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. ज्यामध्ये त्याने पोलीस आणि एका हवालदाराचे नाव घेऊन त्यांच्यावर गंभीर आरोप केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. पुजाऱ्याचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.
पुजार्याने आत्महत्या करण्याआधी एक व्हिडिओ शूट केला. यामध्ये त्याने प्रादेशिक पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक आणि एका हवालदाराने खंडणी मागितल्याचे आणि छळ केल्याचे सांगितले. याच त्रासाला कंटाळून पुजार्याने टोकाचे पाऊल उचलले. मात्र, या आरोपांनंतर अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने यावर उत्तर दिले नाही.