अयोध्या – उत्तराखंडच्या ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी काल अयोध्येच्या राममंदिरात पूजा करण्यास नकार दिला. राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. अशा अपूर्णावस्थेत असलेल्या मंदिरात पूजा करणे धर्मशास्त्राशी विसंगत आहे, असे सांगत त्यांनी पूजा करण्यास नकार दिला. या मंदिरातील राम लल्लाची प्राचीन मूर्ती बदलून त्याऐवजी नवीन मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. यालादेखील स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी विरोध केला होता.
अयोध्येच्या राम मंदिरात पूजा करण्यास शंकराचार्यांचा नकार
