अयोध्येच्या राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांना ब्रेन हॅमरेज

अयोध्या -अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांची प्रकृती अचानक बिघडली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना ब्रेन हॅमरेज झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
काल रात्री उशिरा आचार्य सत्येंद्र दास यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना प्रथम अयोध्येतील सिटी न्यूरो केअर रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्यांना लखनौच्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांना न्यूरोलॉजी विभागाच्या आपत्कालीन युनिटमध्ये दाखल केले. त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांची एक विशेष टीम तैनात केल्याची माहिती आहे. दरम्यान मंदिरातील पूजा आणि इतर धार्मिक विधी पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील, असे रामजन्मभूमी मंदिर प्रशासनाने म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top