न्युयॉर्क
आलिशान गाड्यांच्या यादीत लॅब्युर्गिनी गाडीचे नाव अग्रस्थानी आहे. यातील लॅम्बुर्गिनी म्युरा या १९७० साली उत्पादन झालेल्या एका गाडीचा लवकरच लिलाव होणार असून या गाडीचा डिझायनर मारिलो गॅंडिनी याच्या दिवाणखान्यात ही गाडी इतकी वर्षे ठेवली होती . या गाडीची लिलावात २ ते अडीच कोटी अमेरिकन डॉलर इतकी किंमत मिळेल अशी अपेक्षा आहे.
या गाडीची निर्मिती १९७० साली करण्यात आली होती. कंपनीने अशा प्रकारच्या केवळ ३३८ गाड्याच तयार केल्या होत्या. यातीलच ही गाडी असून ती केवळ ४२ हजार किलोमीटरच धावलेली आहे. या गाडीची कोणतीही दुरूस्ती केलेली नाही. ही गाडी जैसे थे अवस्थेतील आहे. ती मारिलो याच्या ईस्ट रोकोवे शहरातील दिवाणखान्यात ठेवण्यात आली आहे. या गाडीचा लिलाव येत्या १७ व १८ ऑगस्ट रोजी होणार आहे. १९७० साली जेव्हा ही गाडी बाजारात आली होती त्यावेळी ती सर्वात वेगवान गाडी म्हणून ओळखली जात होती. तिचा कमाल वेग २७० किलोमिटर प्रतीतास इतका होता. जुन्या वाहनांच्या शौकीनांसाठी ही मोठीच संधी आहे. या गाडीला नेमकी किती किंमत मिळेल हे आता पाहावे लागणार आहे.