Home / News / अमेरिकेत बेपत्ता झालेल्या महाराष्ट्र पुत्राचा मृत्यू! फडणवीसही गहिवरले

अमेरिकेत बेपत्ता झालेल्या महाराष्ट्र पुत्राचा मृत्यू! फडणवीसही गहिवरले

मुंबई- अमेरिकेतील मोंटेना राज्यातील ग्लॅशिअर नॅशनल पार्कमध्ये वाहून गेलेल्या भारतीय तरुणाचा मतदेह जवळपास महिन्याभराच्या अथक प्रयत्नानंतर सापडला आहे. महाराष्ट्रातील सिद्धांत...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई- अमेरिकेतील मोंटेना राज्यातील ग्लॅशिअर नॅशनल पार्कमध्ये वाहून गेलेल्या भारतीय तरुणाचा मतदेह जवळपास महिन्याभराच्या अथक प्रयत्नानंतर सापडला आहे. महाराष्ट्रातील सिद्धांत पाटील यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त केला आहे. सिद्धांत पाटील हा कॅलिफोर्नियामध्ये काम करत होता. ६ जुलै २०२४ रोजी एव्हालेन्श क्रीकवरच्या ट्रेलवर हायकिंग करत असताना मोठ्या दगडावर उभा त्यावेळी तो अचानक पाण्यात पडला आणि वाहून गेला. त्याच्या मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना सिद्धांतला वाचवण्यात अपयश आले होते. ही घटना घडल्यानंतर रेस्क्यु टीमने शोधकार्य सुरु केले होते मात्र सिद्धांत सापडला नाही त्यामुळे ती शोधमोहीम थांबवली होती. त्यानंतर तब्बल एका महिन्याने शनिवारी ३ ऑगस्ट २०२४ रोजी सिद्धांतचा मृतदेह सापडला.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. सिद्धांत पाटील यांच्या मृत्यूने आम्हाला खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना या काळात देव हिम्मत देवो, कॅलिफोर्नियातील ॲव्हलांच क्रीक येथे हायकिंग करताना सिद्धांत बेपत्ता झाला होता. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही अथक प्रयत्न केल्यानंतरही त्याला वाचवू शकलो नाही. असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Web Title:
संबंधित बातम्या