वॉशिंग्टन- अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर जो बायडेन यांनी काल शेवटचे राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी आपल्या ओव्हल कार्यालयातून निरोपाचे भाषण केले. यावेळी त्यांनी चिंता व्यक्त केली की देशात श्रीमंतांच्या छोट्या वर्गाचे वर्चस्व वाढत आहे. यामुळे देश आणि लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे .
जो बायडन म्हणाले की, अरिकेतील मूठभर श्रीमंत लोकांच्या हाती ताकद असणे हे देशाच्या लोकशाहीला धोक्याचे आहे. यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांनाही धोका आहे. भविष्यात सर्वांना समान संधीही मिळणार नाहीत. देशाला या श्रीमंतांच्या तावडीतून सोडवावे लागेल. अमेरिकेत सर्वांना समान संधी मिळालीच पाहिजे . तुम्ही मेहनत करणे सोडून नका करण तुमची मेहनतच तुम्हाला पुढे घेऊन जाईल.
ते पुढे म्हणाले की, आजकाल मीडियावर प्रचंड दबाव आहे आणि स्वतंत्र पत्रकारिता संपत चालली आहे. चुकीच्या माहितीचे प्रसारण होण्याचे संकट अमेरिकेसाठी आव्हान बनले आहे, यावर उपाय शोधणे अत्यंत आवश्यक आहे.