न्यूयॉर्क – अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील सॅक्रामेंटो काउंटीमध्ये एका गुरुद्वाराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारामागे खलिस्तानी समर्थकांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातो. तीन लोकांमध्ये हा गोळीबार झाला, ज्यात दोन जणांना गोळ्या लागल्या. या दोघांचीही प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर गुरुद्वाराजवळील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खलिस्तानी नेता अमृतपाल सिंह यांच्या अटकेच्या हालचालीने खलिस्तानी समर्थक संतप्त आहेत. याच पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये खलिस्तानी समर्थकांनी धुडघूस घालत भारतीय तिरंग्याचा अपमान केला होता. या घटनेतील हल्लेखोर आणि जखमी व्यक्ती एकमेकांच्या ओळखीचे असल्याचे सांगण्यात येते. असे असले तरी हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेनंतर एका हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसरा हल्लेखोर फरार आहे.
अमेरिकेतील गुरुद्वाराबाहेर