अमेरिकेतही दिवाळीचा धुमधडाका पेनसिल्व्हेनियातअधिकृत सुट्टी जाहीर

हॅरिसबर्ग- सुमारे ५०० वर्षांचा इतिहास असलेले पेनसिल्व्हेनिया आर्थिक, औद्योगिक व राजकीयदृष्ट्या अमेरिकेतील एक महत्त्वाचे राज्य मानले जाते.याच युनायटेड स्टेट्स ऑफ पेनसिल्व्हेनियाने दिवाळीला अधिकृतपणे राष्ट्रीय सुट्टी घोषित केली आहे.सिनेटर निकिल सावल यांनी बुधवारी ट्वीट करुन ही माहिती दिली.

भारतासह जगभरात दिवाळी हा सण उत्साहात साजरा केला जातो मागील वर्षी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनीही मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी केली होती.आता दिवाळीची लोकप्रियता पाहून युनायटेड स्टेट्स ऑफ पेनसिल्व्हेनियाने दिवाळीला राष्ट्रीय सुट्टी घोषित केली आहे. सिनेटर निकिल सावल यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली.त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “सिनेटने दिवाळीला अधिकृत सुट्टी म्हणून मान्यता देण्यासाठी एकमताने मतदान केले. प्रकाशाचा हा सण साजरा करणार्‍या सर्व पेनसिल्व्हेनियन लोकांचे अभिनंदन, तुम्ही अतिशय महत्त्वाचे आहात. हे विधेयक सादर करण्यात मला सहभाही होण्याची संधी दिल्याबद्दल ग्रेग रॉथमन यांचे धन्यवाद.

दरम्यान पेनसिल्व्हेनियाचे सिनेटर ग्रेग रॉथमन आणि सिनेटर निकिल सावल यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये पेनसिल्व्हेनियामध्ये दिवाळीला अधिकृत सुट्टी जाहीर करण्यासाठीचे विधेयक मांडले होते. ज्यावर एकमताने मतदान झाले आणि दिवाळीला अधिकृत सुट्टी जाहीर करण्यास मान्यता देण्यात आली.

पेनसिल्व्हेनियामध्ये अंदाजे २ लाख दक्षिण आशियाई रहिवासी राहतात,त्यापैकी मोठ्या संख्येने दिवाळी साजरी करतात. हजारो पेनसिल्व्हेनियन लोक दरवर्षी दिवाळी साजरी करतात.मंदिरे,प्रार्थनास्थळे आणि समुदाय केंद्रांमध्ये दिवाळीची पूजा केली जाते. “आजचा दिवस आनंदाचा आहे. पेनसिल्व्हेनियामध्ये दिवाळीला मान्यता देण्याचा कायदा सिनेटने नुकताच ५०- ० ने पास केला. दिवाळीला अधिकृत सुट्टी जाहीर केल्याने आपल्या राष्ट्रकुलाची समृद्ध सांस्कृतिक विविधता जपली आहे,” असे ग्रेग रॉथमन यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top