लॉस एंजलिस – अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील लॉस एंजलिसमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. काल सोमवारी दुपारी झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ एवढी नोंदविण्यात होती.
यामध्ये कोणतीही मोठी वित्त किंवा जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही.तसेच भूकंपानंतर भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने त्सुनामीचा इशारा जारी केलेला नाही.
या भूकंपाचा केंद्रबिंदू हायलँड पार्क येथे होता होते,हे ठिकाण प्रसिद्ध हॉलिवूड साइन आणि ग्रिफिथ वेधशाळेजवळ आहे.काल सोमवारी दुपारी दुपारी १२.२० नंतर या परिसरातील इमारती हादरल्या.पासाडेना आणि ग्लेनडेल या जवळच्या शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे भूगर्भीय सर्वेक्षण विभागाने म्हटले आहे. लॉस एंजलिस अग्निशमन विभागाचे १०६ युनिट नुकसानीचे पंचनामे करत आहेत.सुरुवातीला भूकंपाची तीव्रता ४.७ रिश्तर मोजली गेली होती. ती नंतर अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण खात्याने ४.४ रिश्तर इतकी कमी केली.