- गेल्या १५ वर्षांतील सर्वोच्च ०.२५ टक्के व्याज दरवाढ
वॉशिंग्टन – वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्याच्या संघर्षादरम्यान अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्सनी म्हणजेच ०.२५ टक्के वाढ केली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल बँकेने सलग दहाव्यांदा व्याजदरात वाढ केली आहे. या वाढीसह व्याजदर ५.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही १६ वर्षांतील सर्वोच्च पातळी आहे. १९८० नंतर दरवाढीचा हा सर्वात मोठा वेग आहे.
गेल्या वर्षी मार्चपासून अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने दर वाढवण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यावेळी बेंचमार्क व्याज दर शून्य होता, जो आता ५.१ टक्क्यांवर पोहोचला आहे.अमेरिकेत तीन बँका बुडाल्या आहेत, इतर बँकांनी त्या विकत घेतल्या आहेत अशा वेळी हा दर वाढवण्यात आला आहे.
तथापि, फेड रिझर्व्हने बँकिंग क्षेत्रातील गोंधळाच्या दरम्यान व्याजदर वाढीची मोहीम थांबवण्याचे संकेत दिले आहेत. युनायटेड स्टेट्समधील बँका आणि वित्तीय संस्थांना केंद्रीय बँक ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे फेडरल व्याजदर. यामध्ये वाढ झाल्याने ग्राहक आणि व्यवसायांना कर्ज घेणे अधिक महाग होईल.गेल्या वर्षी महागाईचा दर ९.१ टक्के होता.आता हा दर ५.२५ टक्के आहे. त्यामुळे अमेरिकेतील महागाईचा संपूर्ण जगावर परिणाम होणार आहे.
यूएस फेडरल बैठकीनंतर, फेड रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल म्हणाले की, बँकिंग प्रणाली मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आर्थिक व्यवस्थेतील उलथापालथीमुळे खर्च आणि वाढ या दोन्हींचा वेग मंदावू शकतो. या निर्णयामुळे कर्ज अधिक महाग होणार आहे.