अमेरिकेच्या नौदलाने डॉल्फीनवर लावले कॅमेरे

न्यूयॉर्क – बदलत्या तंत्रज्ञानामुळे आज आपण अनेक गोष्टी अगदी सहजरित्या पाहू शकतो, ऐकू शकतो आणि अनेक गोष्टींचा शोध घेऊ शकतो.आता अमेरिकेच्या नौदलाने डॉल्फीनवर कॅमेरे लावून डॉल्फीनच्या जीवनशैलीचा, सवयींचा आणि खाद्य मिळवण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला आहे. जवळजवळ ६ महिने हा कॅमेरा डॉल्फीनवर लावण्यात आला होता.

डॉल्फीन हा एक लोकप्रिय आणि सामाजिक प्राणी आहे.मात्र त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. आपल्यापैकी अनेकांना डॉल्फीनच्या खाण्याचे दोन प्रकार माहीत आहेत.आता त्यांच्याबद्दल जास्त माहीती मिळवण्यासाठी यूएस नॅशनल मरीन मॅमल फाउंडेशनने ६ बॉटलनोज डॉल्फीनवर कॅमेरे लावले होते.

या डॉल्फीनला पाण्याखालील माइन्स ओळखण्याचे आणि काही परमाणू भांडाराचे संरक्षण करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्यावर लावलेल्या या कॅमेऱ्याद्वारे फुटेज आणि ऑडीओ रेकॉर्ड केले आहेत. ज्याद्वारे डॉल्फीनच्या रणनीती आणि खाण्याच्या पद्धती समजून घेण्यास मदत झाली आहे.तज्ञांच्या म्हणण्यानुसार, डॉल्फीन अन्नाच्या शोधात व्हिजन आणि साऊंड दोन्हीचा वापर करतात. यामध्ये दिसलेल्या दृश्यानुसार, मोठ्या प्रमाणात डॉल्फीन माश्यांना किनाऱ्यावरच पकडतात. याआधी डॉल्फीनला सापांबरोबर भांडताना पाहिले असेल मात्र या रेकॉर्डिंगमध्ये डॉल्फीन साप खाऊही शकतात असेही म्हटले आहे. एका डॉल्फीनने ८ पिवळ्या विषारी सापांना खाल्ले असल्याचे दिसून आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top