Home / News / अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कोरोना लागण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कोरोना लागण

वॉशिंग्टन- अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणार्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्यातच आता निवडणूक रिंगणात उभे असलेले विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

वॉशिंग्टन- अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणार्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्यातच आता निवडणूक रिंगणात उभे असलेले विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भातील माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे.

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करिन जीन पीरे यांनी सांगितले की,काल लास वेगास याठिकाणी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्याठिकाणी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे भाषण होणार होते. पण त्याआधी त्यांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांना नाकातून पाणी वाहणे,खोकला आणि थकवा जाणवणे यासारखी सौम्य लक्षणे आहेत. त्यांना संसर्ग रोधक औषध पॅक्सलोविड दिले आहे. त्यांनी लसीचा पहिला डोस आणि बूस्टर डोसही घेतला आहे.त्यांना सध्या विलगीकरणात राहावे लागणार आहे. पण ते आपले कर्तव्य बजावत राहतील.

Web Title:
संबंधित बातम्या