कोलकाता – हिंदी महासागरावर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेकडून भाड्याने घेतलेले मानवरहित टेहाळणी विमान काल बंगालच्या उपसागरात तांत्रिक बिघाडामुळे कोसळले.देशाच्या समुद्री मार्गावर टेहळणी व हेरगिरी करण्यासाठी आणलेल्या या उच्च क्षमतेच्या विमानाचे नाव एम क्यू ९ बी सीगार्डियन असे होते. या विमानात पाण्यावर उतरण्याची क्षमता होती. मात्र बिघाडामुळे ते कोसळले. अमेरिकेच्या जनरल ऑटोमिक्स या कंपनीने हे विमान तयार केले होते. भारताने चार वर्षांपूर्वी हे विमान भाड्याने घेतले होते. त्याचे संचालन तामिळनाडूमधील रजाली या नौदल हवाई तळावरून केले जात होते. नौदलाला विस्तीर्ण प्रदेशाची खात्रीलायक माहिती मिळावी यासाठी या विमानांचा वापर केला जात होता. चीनच्या हिंदी महासागरात वाढलेल्या कारवायांना आळा घालण्यासाठी या विमानांचा वापर केला जात होता. अशी दोन विमाने नौदलाच्या ताफ्यात होती. भारताने अमेरिकेबरोबर अधिक विमानांच्या खरेदीसाठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |