वॉशिंग्टन – जगातील सर्वात शक्तीशाली नेत्याच्या निवडीसाठी म्हणजेच अमेरिकन राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीसाठी आजपासून मतदानाला सुरुवात झाली. आज जवळजवळ ७ कोटी लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यातील १ लाख ४० हजार मतदारांनी अमेरिकेतील निवडणूक आयोगाचे कार्यालय असलेल्या ४२ न्यूऑर्क ब्रॉडवे येथील कार्यालयात जाऊन मतदान केले तर संयुक्त राज्यांच्या विविध भागात तब्बल सात कोटी नागरिकांनी मतदान केले.अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प व उपराष्ट्रपती व डेमोक्रेटिक पार्टीच्या कमला हॅरिस यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. अमेरिकेतील अनेक मान्यवरांनी आपापल्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठीत नागरिक असलेल्या लेडी गागा, उद्योजक एलन मस्क, केटी पेरीलेंड यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे.अमेरिकेतील निवडणूक केवळ मतदानावर होत नाही. तर त्यांना इलेक्टोरेल कॉलेजची मते मिळवणे आवश्यक असते. अमेरिकेत ५३८ इलेक्टोरेल कॉलेज असून ज्या उमेदवाराला २७० पेक्षा अधिक इलेक्टोरेल मते मिळतील ते विजयी होत असतात. अमेरिकन मतदार राज्य पातळीवर मतदान करत असतात. त्यानंतर इलेक्टोरेल कॉलेजच्या मतांच्या आधारे उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात येते. काही राज्ये ही पारंपारिक पक्षांकडे असतात तर काही राज्यांमधील मते वळवता येतात अशा राज्यांवर उमेदवारांनी लक्ष केंद्रीत केले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांमधील एक जाहीर वादविवाद हा महत्त्वाचा ठरत असतो.यंदाच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पद निवडणुकीत अनेक महत्त्वाचे आहेत. त्यात अमेरिकन अर्थव्यवस्था, जगातील विविध भागात सुरु असलेल्या युद्धांमधील अमेरिकेची भूमिका, निर्वासितांबाबतची भूमिका, गर्भपात व बंदूक खरेदीसंदर्भातील कायदे हे मुद्दे जनतेने आवश्यक ठरवले आहेत. जगाच्या दृष्टीकोनातून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पद महत्त्वाचे असते. त्यावर जगाच्या राजकारणाची दिशा ठरत असते.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |