नवी दिल्ली – अमेरिकन फेडरल रिझर्व्ह या आठवड्यात व्याजदर वाढीचा निर्णय जाहीर करणार आहे. यासोबतच टाटा स्टील,अदानी ग्रीन, अंबुजा सिमेंट्स, टायटन, हिरो मोटोकॉर्प यासह अनेक मोठ्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे फेडरल रिझर्व्हचा निर्णय आणि या कंपन्यांचे भक्कम निकाल भारतीय बाजाराची दिशा ठरवणार आहेत.दुसरीकडे कमकुवत झाल्यास बाजारात घसरण दिसून येते.असे मत बाजारातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. याशिवाय विदेशी निधीचे उपक्रम, वाहन विक्रीचे मासिक आकडे आणि जागतिक कल यावरूनही बाजाराचा कल निश्चित होईल.आज ‘महाराष्ट्र दिना’निमित्त शेअर बाजारात सुटी जाहीर करण्यात आली होती.
स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे वरीष्ठ तांत्रिक विश्लेषक प्रवेश गौर यांनी सांगितले की, शुक्रवारी बाजारात ३३०४ कोटींची विक्रमी समभाग खरेदी झाली होती.त्यामुळे भारतीय बाजारावर परदेशी गुंतवणूकदारांनी चांगलाच विश्वास दाखविल्याचे दिसून आले. खरे तर जागतिक स्तरावर व्याजदर वाढ आणि मंदीबाबतची स्थिती अजूनही गोंधळलेली दिसत आहे. यामधे फेडरल बाजार समिती ३ मे रोजी आपला व्याजदर निर्णय घोषित करणार आहे.तर भारतीय शेअर बाजार ४ मे रोजी आपला व्याजदर निर्णय जाहीर करणार आहे.