सॅन फ्रान्सिस्को – अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर मायामीला जाणाऱ्या विमानात प्रवाशांच्या बॅगेत ठेवलेल्या लॅपटॉपचा स्फोट झाला.अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट २०२५ हे विमान काल दुपारी १२.१५ वाजता सॅन फ्रान्सिस्कोहून मायामीला जाणार होते. त्यावेळी प्रवाशांच्या बॅगेत ठेवलेल्या लॅपटॉपमधून अचानक धूर येऊ लागला. त्यामुळे एकच खळबळ माजली.त्यानंतर स्लाइड्स आणि जेटब्रिजचा वापर करून विमानतील प्रवाशांना बाहेर काढले. प्रवाशांना उतरवताना ३ जणांना किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.विमान कंपनीच्या क्रू मेंबर्सनी वेळीच उपाययोजना करत प्रवाशांचे प्राण वाचवले त्याबद्दल प्रवाशांनी त्यांचे आभार व्यक्त केले. एअरलाइनने आपल्या ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल माफी मागितली आहे.
अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात लॅपटॉपचा स्फोट
