अमृतपालच्या साथीदारांना अटक! पंजाबमधील इंटरनेट २४ तास बंद

अमृतसर- पंजाब पोलिसांनी खलिस्तानी समर्थक आणि वारिस पंजाब दे प्रमुख अमृतपाल सिंह याच्या नऊ साथीदारांना शनिवारी अटक केली. मात्र अमृतपाल सिंहला अटक केली का याबाबतची अधिकृत घोषणा पोलिसांनी केलेली नाही. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव पंजाबमधील मोबाइल इंटरनेट सेवा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.

राज्यात शनिवारी दुपारी १२ ते रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद राहणार आहे. अमृतपालविरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. आपल्या निकटवर्तीयाच्या अटकेनंतर अमृतपालने अमृतसर जिल्ह्यातील अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. यानंतरही त्याच्यावर कारवाई न झाल्याने पंजाब पोलिसांवर टीका झाली होती.

Scroll to Top