अमित शहा रविवारी नवी मुंबईत ! महाराष्ट्र भूषण सोहळ्याला हजेरी

मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना आज भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शहा पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये येणार आहेत. रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडणार असून या सोहळ्यात ते हजेरी लावणार आहे.
ज्येष्ठ निरुपणकर अप्पासाहेब धर्मधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. खारघरच्या सेंट्रल मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात अमित शहांच्या हस्ते अप्पासाहेब धर्मधिकारींना मिळणार आहे. नवी मुंबईसह मुंबईच्या महापालिका निवडणुका कधी होणार याकडे सगळेच पक्ष लक्ष लागले आहे. माज्ञ अद्यापही निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाले नसले तरी अमित शहा यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 19 फेब्रुवारीला कोल्हापूरमध्ये आले होते. त्याआधी नागपूरमध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी शहा यांच्यासोबतफडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते.पुणे पोटनिवडणुकीदरम्यानही शहांनी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top