श्रीनगर- कुपवाड्यातील शारदा मंदिर आज भाविकांसाठी खुले करण्यात आले. या सोहळ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहांनी ऑनलाईन हजेरी लावून उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी अमित शहा म्हणाले की, ‘आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. आजच्या शुभदिवशी माता शारदा मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे. आज मी येथे आलो नाही. मात्र भविष्यात मी तेथे येईन आणि माता शारद देवीचे दर्शन करीन. केंद्र सरकारकडे काही जणांनी मागणी केली आहे की, कर्तारपूर कॉरिडोरच्या धर्तीवर शारदा मंदिरही भाविकांसाठी खुले करावे, त्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे.` पीडीपी प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री महुबबा मुफ्ती माध्यामांना म्हणाल्या की, ‘कश्मीरी पंडितची अनेक दिवसांपासून इच्छा होती की, हे मंदिर भाविकांसाठी लवकरात लवकर खुले करावे, ते आज खुले झाल्याने त्यांची इच्छा पूर्ण झाले आहे. ही एक आमच्यासाठी चांगली बाब आहे.