नाशिक-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे नेते अमित ठाकरे आज नाशिकमध्ये येणार होते. मात्र अकोल्याच्या मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे त्यांनी नाशिक दौरा रद्द केला. त्यामुळे त्यांच्या स्वागताच्या तयारीत असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. अमित ठाकरेंच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक होणार होती.