मुंबई – अमित ठाकरे बालीश आहेत. त्यांना राजकारणातील काहीही कळत नाही,असा पलटवार माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी केला.
माहीममधून आधी सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर आमच्या काकांना वाईट वाटले. म्हणून येथून दुसरी उमेदवारी जाहीर झाली. परंतु उमेदवार कितीही असले तरी मला काही फरक पडत नाही,असे अमित ठाकरे यांनी कालच्या प्रचारसभेत म्हटले होते. त्याचा आज महेश सावंत यांनी समाचार घेतला. अमित ठाकरे बालिश आहे.तो काहीही बोलू शकतो. त्याला राजकारणातील काय कळते, पण जनता सुज्ञ आहे. कालची सभा आमची बघा आणि त्यांचीही बघा, दोन्ही सभा पाहिल्यावर लगेच कळेल की स्थानिक माणसे कोणती आणि भाडोत्री माणसे कोणती, असे सावंत म्हणाले.