अमित क्षत्रियांचे नेतृत्व
‘चंद्र ते मंगळ\’ नासाची मोहीम

वॉशिंग्टन- अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाच्या ‘मून टू मार्स\’ म्हणजेच ‘चंद्र ते मंगळ\’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेची धुरा मूळ भारतीय वंशाचे असलेले सॉफ्टवेअर आणि रोबोटिक इंजिनिअर अमित क्षत्रिय यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. चंद्रावर मानवी अस्तित्वाच्या पाऊलखुणा उमटवून नंतर लाल ग्रह मंगळाच्या दिशेने झेप घेण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेची सर्व सूत्रे नासाने क्षत्रिय यांच्याकडे सोपविली आहे.
या मोहिमेसाठी नासाने आपले नवीन कार्यालय सुरू केले असून, त्याला ‘मून टू मार्स\’ प्रोग्राम ऑफिस असे नाव दिले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून चंद्रावर जाण्यासाठी काही धाडसी मोहिमा आखण्यात येणार असून, मंगळावरील पहिल्या मानवी मोहिमेची या माध्यमातून पायाभरणी करण्यात येईल, असेही नेल्सन यांनी स्पष्ट केले. या नव्या मोहिमेचे कार्यालय हे एक्स्प्लोरेशन सिस्टिम डेव्हलपमेंट मिशन डायरेक्टोरेट अंतर्गत असेल त्याचे प्रमुख सहाय्यक प्रशासक जिम फ्री यांच्या नेतृत्वाखाली क्षत्रिय काम करतील, असे सांगण्यात आले. याआधीची कामगिरी क्षत्रिय यांनी या आधी स्पेस लॉँच सिस्टिम ओरिऑन आणि एक्सप्लोरेशन ग्राऊंड सिस्टिम्स प्रोग्रॅमवर देखील काम केले आहे. आर्टेमिस कॅम्पेन डेव्हलपमेंटशी देखील ते संबंधित होते. क्षत्रिय यांची कारकीर्द 2003 मध्ये सॉफ्टवेअर आणि रोबोटिक इंजिनिअर म्हणून सुरू झाली होती.
आंतरराष्ट्रीय अ वकाश स्थानकासाठीच्या रोबोटिक उपकरणांच्या जुळवणीसाठी ते काम करत होते. ते 2014 ते 2017 या काळामध्ये अवकाश स्थानकाचे ते फ्लाइट डायरेक्टर होते. येथे त्यांनी आंतरराष्ट्रीय पथकाचे नेतृत्व करण्याचे काम करत अवकाश स्थानकाच्या दिशेने होणाऱ्या सर्व मोहिमांचे संचलन केले. 2021 मध्ये एक्सप्लोरेशन सिस्टिम्स डेव्हलपमेंट मिशन संचालनालयामध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले आहे.

Scroll to Top