अयोध्या – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अयोध्येतील बहुचर्चित राममंदिरापासून अवघ्या पंधरा -वीस मिनिटांच्या अंतरावर दोन बिघा म्हणजे सुमारे ५ हजार चौरस फुटाचा भूखंड विकत घेतला आहे. या भूखंडाची किंमत ८६ लाख रुपये आहे.शरयू नदीच्या किनारी ५१ एकर क्षेत्रफळावर मुंबईतील प्रसिद्ध लोढा कुटुंबातील द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा ही कंपनी उच्चभ्रूंसाठी बंगल्यांचा मोठा प्रकल्प विकसित करीत आहे. द शरयू असे या प्रकल्पाचे नाव आहे. याच प्रकल्पामध्ये अमिताभ बच्चन यांनी आपले पिता हरिवंशराय बच्चन मेमोरियल ट्रस्टच्या नावे हा भूखंड विकत घेतला आहे.राम मंदिरापासून ७ किलोमीटर अंतरावरील तिहुरा मांझा नावाच्या गावात अत्यंत मोक्याच्या ठिकाणी हा भूखंड आहे. या जागी हरिवंशराय बच्चन मेमोरियल ट्रस्ट उभारण्याचा बच्चन यांचा मानस आहे, असे सांगण्यात आले.
अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत विकत घेतला ८६ लाखांचा भूखंड
