अमरावती-बडनेरा मार्गावर शिवशाही बसला आग

अमरावती- अकोल्याहून अमरावतीकडे जात असलेल्‍या शिवशाही बसला आज सकाळी अमरावती-बडनेरा मार्गावर टायर फुटल्यानंतर आग लागली. त्यामुळे या वर्दळीच्‍या मार्गावर एकच गोंधळ उडाला. प्रवासी सुखरूप बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळलीय अमरावती-बडनेरा मार्गावरुन सकाळी अकोल्‍याहून शिवशाही बस अमरावतीकडे निघाली. ही बस बडनेरा पोलीस ठाण्‍यासमोर आली असताना मागील टायर अचानक फुटून आवाज झाला. शिवशाही बसचे संतुलन बिघडल्‍यानंतर चालकाने बस थांबवली. टायर पंक्‍चर झाल्‍यामुळे सर्व प्रवासी बसमधून खाली उतरत होते. त्यावेळी बसच्‍या उजव्‍या बाजूने पेट घेतला. काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top