अमरावती- पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाच्या पीएम विश्वकर्मा योजनेला वर्षपूर्ती होत आहे. त्यानिमित्त वर्ध्यात वर्षपूर्ती सोहळ्याचे आयोजन केले आहे. यावेळी पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीसोबतच अमरावतीच्या पीएम मेगा टेक्सटाईल पार्कचे ई-भूमिपूजन पंतप्रधान मोदी करणार आहेत. देशभरात एकूण ७ शहरांत टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहेत.
अमरावती टेक्सटाईल पार्कचे मोदींच्या हस्ते ई-भूमिपूजन
