Home / News / अमरावती एमआयडीसीत राम इंडस्ट्रिजला आग

अमरावती एमआयडीसीत राम इंडस्ट्रिजला आग

अमरावती- अमरावती शहरातील बडनेरा मिनी बायपास मार्गावरील एमआयडीसी परिसरात राम इंडस्ट्रिज या खाद्यतेल कंपनीच्‍या कारखान्‍याला आज सकाळी ६ वाजताच्‍या सुमारास...

By: E-Paper Navakal

अमरावती- अमरावती शहरातील बडनेरा मिनी बायपास मार्गावरील एमआयडीसी परिसरात राम इंडस्ट्रिज या खाद्यतेल कंपनीच्‍या कारखान्‍याला आज सकाळी ६ वाजताच्‍या सुमारास भीषण आग लागली. या ठिकाणी शेंगदाणा आणि इतर तेलबियांचे गाळप गेले जाते. कारखान्‍यात ज्‍वलनशील तेलाचा मोठा साठा असल्‍याने आगीने लगेच रौद्र रुप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्‍थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्‍याचे प्रयत्‍न सुरु केले. सुरूवातीला एमआयडीसी परिसरातील वीज पुरवठा बंद करण्‍यात आला आणि त्‍यानंतर उच्‍च दाबाच्‍या बंबांमधून पाणी फवारण्‍यात आले. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सकाळची वेळ असल्‍याने कारखान्‍यात कर्मचारी पोहचलेले नव्‍हते. त्यामुळे या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

Web Title:
संबंधित बातम्या