Home / News / अमरावतीत शेतमजुरांना घेऊन जाणारी रिक्षा उलटली

अमरावतीत शेतमजुरांना घेऊन जाणारी रिक्षा उलटली

अमरावती- अमरावती जिल्हातील तिवसा येथे शेतमजुरांना घेऊन निघालेली रिक्षा उलटली. या अपघात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र १० शेतमजूर...

By: E-Paper Navakal

अमरावती- अमरावती जिल्हातील तिवसा येथे शेतमजुरांना घेऊन निघालेली रिक्षा उलटली. या अपघात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र १० शेतमजूर जखमी झाले, त्यातील ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात तिवसा सार्शी मार्गावर घडला.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील शेतमजुरांना घेऊन रिक्षा तिवसा-शर्शी मार्गावरील असलेल्या शेताकडे निघाला होती. मात्र अचानक रिक्षासमोर कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा रस्त्याच्या खाली उतरून सिमेंट नाल्याच्या भिंतीला धडकली. या अपघातामध्ये १० मजूर जखमी झाले आहेत, यातील ५ मजूर गंभीर जखमी झाले.. या अपघातामधील जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी स्थानिकांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Web Title:
संबंधित बातम्या