मुंबई- काळाचौकी परिसरातील प्रसिद्ध अशा अभ्युदयनगर सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचा पाटपूजन सोहळा बुधवार २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर ‘अभ्युदयनगरच्या राजा ‘चा हा पाटपूजन सोहळा होणार असून या सोहळ्याला गणेश भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश भोसले आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.यंदा या मंडळाचे ६८ वे वर्ष आहे.