प्रयागराज – बॉलिवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री ममता कुलकर्णीने संन्यास घेतला आहे. आता ती महामंडलेश्वर बनली आहे. तिला ही पदवी किन्नर आखाड्याने दिली आहे. महाकुंभमेळ्यात ही प्रक्रिया पार पडली. आता ती ममतानंद गिरी या नावाने ओळखली जाईल.ममता आज सकाळीच महाकुंभमेळ्यामध्ये किन्नर आखाड्यात दाखल झाल्या. त्यांनी किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे तासभर महामंडलेश्वर होण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर ममताला अखिल भारतीय आखाड्याचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांच्याकडे नेण्यात आले. ममता आणि रवींद्र पुरी यांच्यात दीर्घ काळ चर्चा झाली. त्यानंतर महामंडलेश्वर बनवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.तत्पूर्वी सकाळी ममता कुलकर्णी जेव्हा भगवी वस्त्रे आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा अशा वेषात कुंभमेळ्यामध्ये आली तेव्हा तिला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चुरस लागली होती.
अभिनेत्री ममता कुलकर्णी महामंडलेश्वर बनली किन्नर आखाड्याने दिली पदवी
