मुंबई – अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारचा २७ डिसेंबरला कांदिवलीत अपघात झाला होता. या अपघातात मेट्रोचे काम करणाऱ्या एकाचा मजुराचा मृत्यू झाला होता, तर उर्मिला,तिचा कारचालक आणि आमखी एक कामगार गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करत ऊर्मिलाच्या कारचालकाला अटक केली. जवळपास दीड महिन्यानंतर उर्मिलाने या अपघाताप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उर्मिला दाखल केलेल्या याचिकेमध्ये तिने मुंबई पोलिस तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे.
उर्मिला कोठारे यांनी याचिकेत म्हटले आहे की, जिथे हा अपघात झाला, तिथले सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावे अशी विनंती मी केली होती.पण मुंबई पोलिसांनी या प्रकरणामधील सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला. मुंबई पोलीस या प्रकरणामध्ये मुंबईतील एका खासगी कंपनीला पाठीशी घालत आहेत. ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे मेट्रोच्या कामामुळे रस्ता खोदलेला होता. या ठिकाणी कोणतेही योग्य दिशादर्शक फलकही लावलेले नव्हते.
अभिनेत्री उर्मिला कोठारे अपघात प्रकरणी न्यायालयात
