पुणे – आम्ही सारे ब्राह्मण व ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका या नियतकालिकांच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा ब्राह्मण भूषण पुरस्कार अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे. मुख्य संपादक या नियकालिकेचे संपादक भालचंद्र कुलकर्णी, संचालक संजय ओर्पे यांनी ही माहिती दिली आहे. येत्या शनिवारी 6 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता मॉडर्न कॉलेज सभाग़ृह शिवाजीनगर येथे हा सोहळा पार पडणार आहे. रोख बक्षिस, शाल व सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकृष्ण चितळे (अध्यक्ष, महाराष्ट्र चित्पावन संघ) तर डॉ. गजानन एकबोटे (कार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी) हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. व्यावसायिक नाटकांच्या 12 हजार पाचशेंहून अधिक प्रयोगांचा टप्पा दामले यांनी पार केला आहे. अभिनेते प्रशांत दामले यांना नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.
अभिनेते प्रशांत दामले यांना’ब्राह्मण भूषण’ पुरस्कार जाहीर
