मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आता ८७ वर्षांचे झाले आहेत. पण वयाची ८७ शी ओलांडल्यानंतरही धर्मेंद्र आजही तितकेच उत्साही असतात. आजही आपल्या अभिनयाने ते चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. अनेकदा ते एक्सवर आपल्या चाहत्यांसह शायरीही शेअर करत असतात. नुकताच त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शायरीच्या माध्यमातून त्यांनी आपली तब्येतीची स्थिती सांगितली आहे.
या व्हिडीओत ते बोलतात की, ‘तो सुनिए जनाब मैं क्या लिखता हूं…आंखें रंग नहीं पहचानतीं, कहता है ले चल चमन में। कोई समझाए दिल-ए-नादान को, अब तो पैरों में भी दम नहीं है।’. हा व्हिडीओ शेअर करताना धर्मेंद्र यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘ऐ हकीकत-ए-जिंदगी, मैं जवान हूं अभी।