मुंबई -रंगभूमीवर सक्रिय असलेला तरुण अभिनेता सुबोध वाळणकर याचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अभिनेते-दिग्दर्शक चंद्रशेखर सांडवे यांनी या दु:खद घटनेची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. सुबोधने अलीकडेच ‘सवाई एकांकिका स्पर्धा २०२४’मध्ये “चिनाब से रावी तक” या एकांकिकेत महत्त्वाची भूमिका साकारून प्रथम क्रमांक मिळवला होता. त्याने ‘२१७ पद्मिनी धाम’ आणि ‘बॉम्बे १७’ सारख्या नाटकांतही अभिनय केला होता. सुभोधच्या निधनानंतर कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अभिनेता सुबोध वाळणकरचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
